Tuesday, March 21, 2017

Scope in Music Field.

*_संगीत क्षेत्रात उत्तम संधी_*

गायक किंवा वादक होण्याव्यतिरिक्त या क्षेत्रात कम्पोजर, प्रशिक्षक, गीतकार, म्युझिक पब्लिशर, म्युझिक जर्नालिस्ट, डिस्क जॉकी, म्युझिक थेरेपिस्ट, आर्टिस्ट तसेच संगीत कंपन्यांचे जनसंपर्क अधिकारी असे करीयरचे विविध पर्याय उपलब्ध असतात. म्युझिक चॅनल्सची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता व कार्यक्रमांना कार्पोरेट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दिले जाणारे प्रायोजकत्व, यामुळे संगीत क्षेत्रात करीयर करण्याकडे उमेदवारांचा कल वाढत आहे.

🍄 *_शैक्षणिक पात्रता_*

संगीत क्षेत्रात करियर करत असताना कुठली विशेष शैक्षणिक योग्यतेची आवश्यकता नसते. तरी देखील कुठल्याही संगीत महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी दहावी (10+2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संगीत क्षेत्रात सर्टिफिकेट कोर्स, बॅचलर डिग्री, डिप्लोमा कोर्स तसेच पोस्ट ग्रेजुएट कोर्स उपलब्ध आहे. सर्टिफिकेट कोर्सचा कालवधी एक वर्ष, बॅचलर डिग्रीचा तीन वर्ष तर डिप्लोमा व पोस्ट ग्रेजुएट कोर्सचा दोन वर्षे आहे.  संगीत विषयाचे शिक्षण व प्रशिक्षण विविध संस्थामधून दिले जाते. भारतात मद्रास येथील कलाक्षेत्र व दिल्ली येथील भारतीय कला केंद्र, या संस्था संगीत क्षेत्रातील नामांकित संस्था आहेत.

🍄  *_संगीत विषयाचा अभ्यासक्रम_*

👉 बी.ए. ऑनर्स म्युझिक

👉 बी.ए. व्हिज्युअल आर्ट/ म्युझिक / डांस व ड्रामा

👉 बी.ए. म्युझिक

👉 बी.ए. तबला

👉 बी.एफ.ए तबला

👉 सर्टिफिकेट कोर्स अन म्युझिक

👉 म्युझिक डिग्री

👉 म्युझिक डिप्लोमा

👉 सितार डिप्लोमा

👉 तबला डिप्लोमा

👉 एम.एस इन म्युझिक

👉 एम.फिल इन म्युझिक

👉 पीएचडी इन म्युझिक

👉 अंडरग्रॅज्युएट डिप्लोमा इन म्युझिक



🍄  *_महाराष्ट्रातील संगीत संस्था_*

👉 गांधर्व संगीत महाविद्यालय मिरज, जि. सांगली

👉 संगीत विभाग, ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ परिसर, गणेश खिंड, पुणे.

👉 संगीत विभाग, एस. एन. डी. टी. महाविद्यालय, मुंबई.

👉 संगीत विभाग, एस. एम. आर. के महाविद्यालय, नाशिक.

👉 संगीत विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.

🍄  *_मध्यप्रदेशातील संगीत संस्था_*

👉 सिलाम्बम, पद्मा एस. राघवन बी 2, 49, एमआईजी कॉलनी, संजय उपवन, इंदौर.

👉 कला पद्मा भरतनाट्यम डांस अकॅडमी, शंकर होमबाल, 185, कल्पना नगर, रायसेन रोड, भोपाल.

👉 नृत्यायन लता सिंग, एमआईजी, 69, कोटरा सुल्तानाबाद, भोपाल

👉 इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, खैरागढ़

👉 अवधेश प्रतापसिंग विश्वविद्यालय, रीवा